सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात रविवारी ट्रॅफिक जॅम झाले. भल्या पहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. सध्या पोलिसांकडून घाटात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
पुणे – सातारा मार्गावरील महत्वाचा असलेला खंबाटकी घाट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारणही तसे आहे. कारण या घाटात अलीकडच्या काळात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
काल शनिवार आणि आज रविवारच्या शाळा, महाविद्यालयांना व सरकारी खासगी कार्यालयांना सुट्ट्या आल्याने मुंबई पुण्यातून अनेक जण आपल्या गावाकडे आणि महाबळेश्वर पाचगणीकडे पर्यटनासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, यामुळे खंबाटकी घाटात वाहनांची संख्या वाढू लागली असून वाहतूक कोंडी होत आहे.