रस्ता खुला झाल्यास आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार नाही; कराड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । काही दिवसापूर्वी कराड बाजार समितीच्या मुख्य आवारातून रहिवाशी रस्त्याची मागणी हि झाली होती. आणि पाच ते सहा दिवसापूर्वी याठिकाणी असणारी रस्त्यातील भिंत ३ फुटांनी पाडण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण व्यापार तिन्ही असोसिएशनने बंद ठेवले आहेत. या याठिकाणी रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडी होऊन अडचण निर्माण होणार आहे. तसेच मालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उद्भवणार आहे. वाहतूक कोंडीमुळे आम्हाला व्यापार करता येणार नाही, याबाबत आम्ही निवेदने दिली असून निषेध म्हणून आम्ही आमची दुकाने बंद ठेवली आहेत. जर रस्ता खुला झाल्यास आम्ही आमची दुकाने सुरु ठेवणार नाही, अशा इशारा व्यापाऱ्यांनी यावेळी दिला.

कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्त्याच्या संदर्भातील प्रश्न हा अधिकच पेटला असून काल येथील रहिवाशांनी थेट पालिकेवरच धडक मोर्चा काढला. तर दुसरीकडे येथील संपूर्ण व्यापारी वर्गांनी देखील आपली दुकाने, व्यवसाय हे बंद ठेवत रस्त्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. दरम्यान, आज व्यापाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधता आपले मत मांडले.

यावेळी व्यापारी आणासो पाटील म्हणाले की, आम्ही बाजार समिती आवारात गेल्या अनेक वर्षांपासून व्यापार करत आलेलो आहोत. आमच्या मालाची वाहतूक करणारी वाहने हि बाजार समितीच्या आवारातील रस्त्यावर उभी केली जातात. मात्र, येथील रस्ता हा खुला झाल्यास रहिवाशी देखील या रस्त्यावरून ये जा करतील त्यामुळे वाहनांचीही वर्दळ वाढणार आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन आम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. कराड बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांचा माल हा उघड्यावर ठेवला जातो.

त्यांच्या संरक्षणासाठी येथील असणारे गेट्स रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बंद केली जातात. जेणेकरून शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मालाचे संरक्षण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मार्केट यार्ड मर्चंट असोसिएशन, कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, श्यामराव भाजीपाला मार्केट यांच्यावतीने आम्ही ठेवलेल्या बंदला पाठींबा दर्शवला आहे. आम्ही कालपासून बेमुदत बंदचा इशारा हा जिल्हाधिकारी, तहसीलदार, बाजार समितीचे सभापती यांना निवेदनाद्वारे दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी व्यापारी राजेश शहा म्हणाले की, कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारात दुकाने असणारे व्यापारी तसेच ज्याचा शेतीमाल आहे असे शेतकरी बाहेर राहणारे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे संरक्षण होणे जास्त गरजेचे आहे. ठिकाणी समितीची संरक्षक मार्केट यार्ड मर्चंट असोशिएसनने दोन दिवसापूर्वी त्यांचे निवेदन सभापती विजय कदम यांना दिले होते. त्यानुसार आजपासून आम्ही दुकाने बंद ठेवून त्याचा निषेध केला आहे.