कराड प्रतिनिधी । कराड शहरालगत असलेल्या पाटण तिकाटने येथील वारुंजी फाटारील पुलाखाली जळण घेऊन जाणारा ट्रॅक्टर रिक्षावर पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड श्रालागत पाटण टिकाटने परिसरात वारुंजी फाटावर उदान पुलाखालून एक जळणाने भरलेला ट्रॅक्टर सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. ट्रॅक्टरच्या बाजूने रिक्षा देखील निघाली होती. यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील जळणाने भरलेली ट्रॉली अचानक पलटी झाली. ट्रॉली शेजारून निघालेल्या रिक्षावर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली.
या अपघाताची माहिती मिळताच दस्तगीर आगा, हायवे पेट्रोलिंगचे अजय चव्हाण, अभिजीत लिबारे, अनिल देसाई, ॲम्बुलन्स ड्रायव्हर महेश ओव्हाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षातील जखमींना खासगी रुग्णालयातूपचारासाठी हलवले. तसेच ब्रिजखालील वाहतूक सुरळीत केली.