जिल्ह्यातील ‘या’ जलाशयात देशातील पहिल्या सोलर बोटीचा पर्यटकांना घेता येणार आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रशासनाकडून खूप प्रयत्न केले जात आहेत. जल पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा तयार करण्यात आला आहे. त्यांचबरोबर पर्यटकांना जलपर्यटन करता यावे यासाठी कोयना जलाशयात देशातील पहिली सोलर बोट उपलब्ध करण्यात आली आहे. मेड इन इंडिया असलेली भारतातील पहिली सोलर बोट सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयात वापरण्यात येणार असून कोयनेच्या गोड्या पाण्यामध्ये ही सोलर बोट चालवण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात पर्यटकांना कोयना जलाशयात फिरण्यासाठी आता सोलर बोटचा वापर करण्यात येत आहे. या सोलर बोटमुळे प्रदूषण कमी होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. कोयना जलाशयावरील जलपर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला आहे. संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.

WhatsApp Image 2024 05 26 at 5.43.28 PM

पर्यटकांसाठी बोट, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना बोट, हाऊस बोट चालविण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येत आहे. हि बोट सध्या पर्यकांसाठी आकर्षण ठरत आहे.