केळवली धबधब्यावर आता पर्यटकांना प्रवेश बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | परळी खोऱ्यातील निसर्गरम्य वातावरणात केळवली धबधबा आता प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनाला प्रारंभ होत असतानाच, युवक बुडाल्याची घटना घडल्यानंतर केळवली धबध्याला एंट्री बंद केली आहे. पोलिस आणि ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, धबधबा परिसरात शिरकाव केल्यासही संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सांडवलीच्या बाजूने किंवा केळवलीच्या बाजूने सांडवलीच्या बाजूने किंवा केळवलीच्या बाजूने दोन्हीकडे याबाबतच्या तसे सूचना फलक ही लावण्यात आले आहेत. केळवली धबधबा हा जणू निसर्गाचा साक्षात्कार आहे. मात्र, हा निसर्ग डोळ्यात साठवण्याऐवजी डोळ्यात अश्रू येण्याचे प्रकार घडू लागले आहेत. धबधबा परिसरात कोणत्याही सुरक्षा नसल्याने या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

दि. ३० जून रोजी कराडचा युवक धबधब्यातील डोहात बुडाला होता. यानंतर अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वीही युवक बुडाल्यानंतर धबधबा बंद ठेवला होता.