हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? सातारा जिल्ह्यातील ‘या’ TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । हिवाळ्यातील गुलाबी थंडीत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्याने कुणी बाईक तर कुणी चारचाकी गाडीतून फिरायला जायचा प्लॅन हा करत असतील तर त्यांच्यासाठी हि माहिती खूप उपयुक्त ठरेल. हिवाळा ऋतू असल्याने सध्या सर्वत्र गुलाबी थंडी पडत आहे. या थंडीत दुसरी तिसरीकडे न जाता सातारा जिल्ह्यातील अशा पाच ठिकाणी जावा कि त्या ठिकाणी तुम्हाला खूप एन्जॉय करता येऊ शकेल.

1) महाबळेश्वर-पाचगणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सुंदर निसर्गासाठी आणि तेथील स्पेशल पॉईंट्स साठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. हिवाळ्याच्या दिवसात पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात. समुद्रसपाटीपासून 1347 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर बसस्थानकापासून 7 किमी अंतरावर, केट पॉईंट आणि एलिफंट्स हेड पॉईंट हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचे सर्वात नयनरम्य दृश्य आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या बाजूस वसलेले असे अत्युत्तम थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. आल्हाददायक हवेमुळे या ठिकाणाला हवापालटासाठी प्राधान्य दिले जाते. मुंबई-पुणे-कोल्हापूर पट्टय़ातील लोकांसाठी दोन दिवस हवापालटासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पाचगणी महाबळेश्वरपासून अवघ्या 20 किमी अंतरावर आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी आल्यास पर्यटकांना गुलाबी थंडीचा चांगला अनुभव घेता येईल. सध्या पाचगणी व महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून दोन्ही गिरिस्थाने गारठली आहे.

2) कास पठारही आकर्षणाचे ठिकाण

साताऱ्याला कास पठारापासून फक्त 24 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याला कास पठार असेही म्हणतात. या क्षेत्राच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. 1,000 एकर पसरलेले आणि 1200 मीटर उंचीवर असलेले हे भव्य ज्वालामुखीय लॅटरिटिक पठार, त्याच्या समृद्ध, चमकदार किरमिजी रंगाच्या मातीमुळे पावसाळी-हंगाम पिकनिक स्पॉट्ससाठी ओळखले जाते. या ठिकाणी रंगबीरंगी फुलामध्ये व हिरव्या गवतात फिरण्याचा आनंद प्रयत्न घेऊ शकतात.

3) भांबवली पुष्प पठार

भांबवली पुष्प पठार हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. हे सातारा शहरापासून अंदाजे 30 किमी दूर स्थित आहे. हे पठार उंच डोंगराळ आणि गवताळ प्रदेशात वसलेले आहे. पाऊस, विशेषकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत याला एक पुष्प पठार बनवतो. भांबवली पठारवर 150 पेक्षा अधिक प्रकारचे फुले, झुडुपे आणि गवत आहेत. पठार मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट दगडाच बनलेली आहे. बेस्टॉल्ट खडक हा जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर एक इंच पेक्षा जास्त असतो. भांबवली पठारवर उगवलेले झाडे सामान्यतः झुडुपे या प्रकारचे आहेत. भांबवली पुष्प पठार हे देखील त्याच्या दुर्मिळ वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा इथं आढळून येणाऱ्या प्राण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या आणि दुर्मिळ फुलांनी हे ठिकाण भरलेल आहे. करवी, सोनकी, स्मितिया, बाल्म, ऑर्किड अशा काही पुष्प जाती आहेत ज्या या पठारावर उमलतात.

4) पाटणचे कोयनानगर

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ठिकाणांना तर मग कोयनेला फिरायला येताना या पर्यटनस्थळी 7 ठिकाणे खास महत्वाची आहेत. कोयना धरण, कोयनानगर फुलपाखरू उद्यान, ओझर्डे धबधबा, सुंदरगड, भैरवगड, रामबाण तीर्थक्षेत्र, प्रसिद्ध येराड देवस्थान, रूद्रेश्वर मंदीर, चाफळचं राम मंदिर, प्रति औदुंबर, पाटणकर वाड्यातील राम मंदिर, ग्रामदैवत लक्ष्मीदेवीचे मंदिर, नेहरु उद्यान, तारळी धरण, काठीटेक डोंगर, १४ वरगळी, वाल्मीक पठार, उलटा सडावाघापूरचा धबधबा, तारळे गावजत्रा, सडा वाघापूर-वनकुसावडे पवनचक्की प्रकल्प अशी खास ठिकाणं पाटण तालुक्यात आहेत.

A) कोयना धरण : पाटण तालुक्यातील हेळवाक या गावाजवळ कोयनाधरण आहे. डोंगररांगांनी निर्माण झालेल्या खोल दरीत कोयना नदी आडवून हे प्रचंड धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळ वसलेल्या वस्ती वजा गावाला कोयनानगर असे म्हणतात. महाराष्ट्राला वरदान ठरलेले कोयना धरणाच्या हे विशाल शिवसागर जलाशयात १३ मार्च १९९९ ला लेक टॅपिगचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. या धरणावर चार टप्प्यामध्ये विद्युत निर्मिती करण्यात येते.

B) कोयनानगर फुलपाखरू उद्यान : सर्वांचे लाडके “नेहरु चाचा” यांच्या स्मरणार्थ कोयनानगर येथे बांधण्यात आलेलं नेहरु उद्यान होय. कोयना धरणाच्या उजव्या बाजूकडील टेकडीवर पं. नेहरू उद्यान तयार केले आहे. १८ डिसेंबर १९९९ रोजी ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. येथे पंडित नेहरूंचे स्मारक बांधण्यात आले असून, तेथे आकर्षक विद्युत रोषणाई करून कारंजे, धबधबे तयार करण्यात आले आहेत.

C) रामबाण तीर्थक्षेत्र : निसर्गसौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यात पुण्यातीर्थ लाभलेली आहेत. ओझर्डे धबधब्यापासून केवळ अडीच ते तीन कि.मी. अंतरावर रामबाण तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी श्रीराम , सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास भोगण्यासाठी भटकंती करत होते. त्यावेळी ते नवजा जंगलात पोहचले. चालून-चालून थकलेल्या सीतेला वाटेत तहान लागली. यावेळी सीतेने श्रीरामांकडे पाणी पिण्यासाठी हट्ट धरला. या घनदाट जंगलात कोठे पाण्याचा माग लागत नव्हता. अशावेळी श्रीरामांनी जंगलातील एका मोठ्या दगडावर बाणाचा प्रहार केला. त्यावेळी त्या दगडातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. सीता आणि लक्ष्मणाने प्रसन्न होऊन या पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि तेथे थोड्यावेळ विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात केली, अशी रामायण काळातील दंतकथा रामबाण तीर्थाविषयी सांगितली जाते.

D) चाफळ राममंदिर : पाटण उंब्रज या रस्त्यावरील चाफळ हे ठिकाण. श्री समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची येथे स्थापना केली. रामदास स्वामी बारावर्षाच्या तीर्थाटनानंतर आलयानंतर तयांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थांनी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर बांधले. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविद मफतलाल यांनी १९७२ मध्ये नवीन बांधून दिले. समर्थ स्थापित ११ मारुतीपैकी ३ मारुती याच परिसरात आहेत. चाफळ पासून १.५ कि.मी. अंतरावर माजलगाव येथेही रामदासांनी ११ मारुतीपैकी एकाची स्थापना केली. कवी यशवंताचे जन्मगांव चाफळ. मंदीराचे सभागृह नऊ खणांचे आहे.

5) अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतारा किल्ला हा समुद्रसपाटीपासून सुमारे 3,300 फूट उंचीवर असलेली ही भव्य वास्तू आहे, याला “साताऱ्याचा किल्ला” असेही म्हटले जाते तसेच हा किल्ला संपूर्ण साताऱ्याचे चित्तथरारक दृश्य देतो. या किल्ल्याची काही मुख्य आकर्षणे सुद्धा आहेत. जसे की: हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि मंगला देवी मंदिर तसेच भव्य तारा राणीच्या महालाव्यतिरिक्त, अजिंक्यतारा किल्ल्यातील काही मुख्य आकर्षणे तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्‍ही तुमच्‍या मित्रांसोबत आणि कुटूंबासोबत काही वेळ घालवण्‍यासाठी एक उत्तम पिकनिक स्‍थान शोधत असाल तर अजिंक्यतारा किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या.