आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस; लढतीचे चित्र स्पष्ट होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून २१५ उमेदवारांची २७९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी या अर्जांची प्रशासकीय छाननी झाली. यामध्ये १९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले; तर ८१ अर्ज अवैध ठरवण्यात आले. दरम्यान, आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ असून कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्ज माघार घेतल्याने दुपारनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघातून दिग्गज मंडळींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे.