कराडातील प्रीतीसंगमावर मोठ्या घडामोडी; अजितदादा अन् रोहित पवार यांची झाली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आज कराड येथील प्रीतिसंगमवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासोबत कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी काही मिनिटांमध्ये अजितदादा पवार देखील दाखल झाले. प्रीतिसंगमवर दाखल होताच आ. रोहित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. पक्ष फुटीनंतर एकाचवेळी दोन काका आणि एक पुतण्या एकत्रित येण्याची ही पहिली वेळ असल्याचे याची चर्चा चांगलीच रंगली आहे

खासदार शरद पवार हे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी काल रविवारी आदल्यादिवशीच कराड मुक्कामी आले होते. तर अजित पवार हे देखील सोमवारी सकाळी प्रीतिसंगमावर येणार होते. या ठिकाणी काका पुतण्याची भेट होणार का आणि झाली तर नेमकं काय घडणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान आज सकाळी काका शरद पवार आणि पुतण्या अजित दादा हे दोघेही एकत्रित आल्याचे पहायला मिळाले.

रोहित पवार आणि अजितदादा समोरासमोर

विधनासभा निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं तर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. मविआच्या अनेक मातब्बरांचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देखील मोठा फटका बसला. या पक्षातील रोहित पवार, रोहित पाटील, जयंत पाटील हे निवडून आले आहेत. निकालानंतर रोहित पवार यांनी आज कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. यावेळी समाधीस्थळी आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अजितदादा पवार हे देखील दाखल झाले. त्यावेळी काका अजितदादा आणि पुतण्या रोहित पवार हे एकमेकांसमोर आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार यांनी काका अजितदादा यांची भेट घेत वाकून नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद देखील घेतला.

karad sharad pawae

खासदार शरद पवारांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांकडून अभिवादन

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथील प्रीतीसंगमावरील समाधीस्थळी सकाळी आठ वाजता खासदार शरदचंद्र पवार दाखल झाले. या याठिकाणी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार निलेश लंके, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

…तर तुझं काय झालं असतं? अजित दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

कराड येथील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सकाळी आपल्या आमदारांसोबत हजर झाले. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत स्मृतीस्थळी येत यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली. याचवेळी अजितदादा आणि त्यांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. यावेळी अजितदादांनी पुतण्या रोहित पवाराच्या हातात हात दिला. अजितदादांनी रोहित यांना ‘दर्शन घे काकाचं, रोहित तू थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं,’ असा मिश्किल टोला लगावला.

काका-पुतण्याच्या दौऱ्याकडं लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सकाळी ७ वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होऊन तेथून मोटारीने ते ८ वाजता कराडात येऊन यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन करणार होते. ठरल्याप्रमाणे ते ठीक आठ वाजता कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी साडे आठ वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. विधानसभा निवडणुकीत कुटुंबातच संघर्ष झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आज प्रीतिसंगमावर आल्याचे पहायला मिळाले. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.