कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा राष्ट्रीय महामार्गावर अनेक घटना घडत असतात. मात्र, नुकतीच एक विचित्र घटना घडली आहे. महामार्गावरून जात असताना एका ट्रक चालकाने बारा किलोमीटरपर्यंत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला ट्रकवर लटकून नेले. त्या कर्मचाऱ्याने ट्रक थांबवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद असलेल्या ट्रक चालकाने कर्मचाऱ्याला तसेच पुढे नेले. या घटनेचा व्हिडीओ एकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मद्यधुंद असलेल्या ट्रक चालक शुक्रवारी रात्री ट्रक (क्रमांक TN48 BC6280) घेऊन पुणे – सातारा महामार्गावरून निघाला होता. खेडशिवापूर टोल नाक्यावर संबंधित चालक तर्क घेऊन आला असता. तर्क चालकास टोल नाक्यावर तैनात असलेल्या सौरभ कोंडे या कर्मचाऱ्याने टोलचे पैसे मागितले. त्या कर्मचाऱ्याने तुझा ट्रक ओव्हरलोड आहे का? हा प्रश्न विचारला. परंतु, मद्यधुंद असलेल्या त्या चालकाने ड्रायव्हर साईडने चढलेल्या त्या टोल कर्मचाऱ्याला घेऊन सुमारे १२ किलोमीटरपर्यंत लटकून नेले.
मद्यधुंद असलेला ट्रक चालक पुणे- सातारा महामार्गावर वेडावाकडा ट्रक वेगाने चालवत होता. हा थरार दहा ते पंधरा मिनिटे सुरु होता. एकाने मोबाईल कॅमेरामध्ये हा सर्व प्रकार कैद केला. या मार्गावर नसरापूर येथील गावकऱ्यांनी ट्रक अडवला. त्यावेळी ट्रकचालक थांबला अन् लटकलेल्या सौरभ कोंडे यांची सुटका झाली. मृत्यूच्या दारातून सौरभ कोंडे बाहेर आले.
खेड-शिवापूर टोलनाक्यावरील हा थरार १२ किमी सुरुच होता. कर्मचाऱ्याचा जीव होता धोक्यात… pic.twitter.com/G9HJ0oBCaM
— jitendra (@jitendrazavar) July 15, 2023
गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात
टोलवरील कर्मचाऱ्यास घेऊन जात असलेल्या मद्यधुंद ट्रक चालकाचा ट्रक (क्रमांक TN48 BC6280) हा आणि चालक यांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल ते नसरापूर गावापर्यंत हा प्रकार सुरु होता. किकवी पोलिसांनी त्या ट्रक चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा ट्रक कोठून आला होता, कुठे जात होता, त्याच्या काय सामान होते? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच मिळणार आहे.