हॉटेलचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक, कारसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | हॉटेल साहित्य चोरणाऱ्या तिघांना बोरगाव पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरेलेले वाहन असा एकुण 8 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शंकर जयवंत शिंदे (रा. सोनगाव निंब, ता. जि. सातारा), राज सतीश दनाणे (रा. वनवासवाडी, ता. जि. सातारा), प्रज्वल वसंत जाधव (संभाजीनगर-गोडोली, ता. जि. सातारा) अशी अटक केल्या तिघा आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने सातारा उपविभागाचे डी वाय एस पी राजीव नवले यांनी बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांना कारवाईबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. ८ /10/2024 रोजी रात्रौ 8.00 वा. ते 25/11/2024 रोजीचे सायंकाळी 6.30 वा.चे सुमारास मौजे अतीत ता. जि.सातारा येथील माजगाव फाटा येथील न्यु हॉटेल सिमरनजित या हॉटेलच्या किचनमधील स्टील, धातुचे किचन फुड काऊंटर टेबले, सर्व्हिस टेबले, भट्टीसह बर्नर, मसाला काऊंटर, असे 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचे असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाला होता.

बोरगाव पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण व कॉन्स्टेबल कणसे यांना गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एक चार चाकी वाहन क्रमांक MH11-DD-2072 हे संशयितरित्या हॉटेलच्या आवारात वावरताना दिसल्याचे सांगितले. त्यावरुन डीबी पथकाने सदर वाहनाचा शोध घेवुन त्यावरील चालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्याने मी तसेच माझे दोन मित्रांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्या तिघांना ताब्यात घेवुन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल मेमोरडंम पंचनामाव्दारे हस्तगत केली.

तसेच गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीचे कैरी वाहन क्रमांक MH11-DD-2072 असे वाहन जप्त करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरेलेले वाहन असा एकुण 8 लाख 18 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन सदर गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

पोलीस अधिक्षक श्री समीर शेख व श्रीमत डॉ. वैशाली कडुकर अप्पर अधिक्षक सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांचे सुचनेप्रमाणे व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, अतुल कणसे, सफौ प्रविण शिंदे, सतीश पवार, संजय जाधव यांनी सदरची कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रेणी पोउपनि कारळे हे करीत आहेत.