पंढरपूर रस्त्यावरील बरड गावच्या हद्दीत पहाटे भीषण अपघात; 3 ठार तर गाडीचा झाला चक्काचूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दिवाळीच्या सणादिवशी एक भीषण अपघाताची घटना फलटण तालुक्यात घडली आहे. फलटण तालुक्यातील पंढरपूर रस्त्यावर बरड गावच्या हद्दीत चार चाकी गाडीचा पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील भैरवनाथ ट्रक गॅरेजचे मालक सागर चौरे (वय ३४ रा. पाडेगाव ता खंडाळा) चालक निलेश शिर्के (रा. खटाव) व भाऊसो जमदाडे (रा खेड ता खंडाळा) हे तिघेजण चाकी (क्रमांक H53A 0514) मधून फलटण कडे निघाले होते. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास बरडहून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धाक दिली. धडक इतकी भीषण होती की यामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

परिसरातील नागरिकांनी चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात पाठवले परंतू तिघा प्रवाशांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांच्याही मृत्यूमुळे पाडेगाव खटाव व खेड या गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.