प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून तिघांनी काढला ‘त्याचा’ काटा; नंतर खूनाच्या गुन्ह्यात झाली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाटखळ माथा ता. जि. सातारा येथे कॅनॉलमध्ये एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व सातारा तालुका पोलिसांनी तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा खून प्रेमासंबधातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. व यश आले असून याप्रकरणी तीन संशयीतास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

विजय सुरेश भोसले (वय 23, मूळ रा. भोसले मळा नागठाणे ता. जि. सातारा सध्या रा. नेले पोस्ट किडगाव ता. जिल्हा सातारा), दादा जयराम बिचुकले (वय 43, रा. बावधन ता. वाई जि. सातारा), मनीषा दादा बिचुकले (वय 27 , रा. बावधन ता. वाई, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि. 9 रोजी पाटखळ माथा ता. सातारा, येथील कन्हेर डाव्या कालव्यातून वाहत असलेले अनोळखी प्रेत आढळून आल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर अनोळखी प्रेताचे शवविच्छेदन सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथील फॉरेन्सीक तज्ञ डॉ. राहुल खाडे, वैद्यकीय अकारी डॉ. हिरास यांनी पोस्टमार्टम केले. यावेळी त्यांनी सबंधित व्यक्तीचे दोन्ही पाय बांधले असल्याने सदर प्रकार हा घातपाताचा असल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी सदर अनोळखी प्रेताची ओळख पटवण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विविध अशी पथके तयार करुन तपास केला असता त्यांना सदर अनोळखी मयत व्यक्ती ही खेड ता. जि. सातारा येथील शरद मधुकर पवार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

यानंतर पोलीसांनी सदर मयताचा घातपात केलेबाबत गोपनिय माहिती प्राप्त केली असता सदर शरद पवार याचे वावधन येथील महिलेशी प्रेमसबंध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन मयत शरद पवार व नेले किडगांव ता. जि. सातारा येथील संशयिताची मागील काही दिवसापुर्वी भांडणे झाली असल्याचे माहिती पोलीसांना प्राप्त झाल्याने पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संशयितांनी शरद मधुकर पवार याचा वाढे ता.जि. सातारा गावचे हद्दीमध्ये दि. 5 ऑगस्ट रोजी खुन करुन त्यास जवळच असलेल्या कण्हेर डाव्या कॅनॉलमध्ये टाकुन दिले असल्याची कबुली दिली. या प्रकरणात शरद मधुकर पवार याचा खुन केले बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचे तपासामध्ये विजय सुरेश भोसले, दादा जयराम बिचुकले व मनिषा दादा बिचुकले अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके , तसेच सातारा तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील स्थागुशा सातारा, पो.हवा दादा परीहार, पोहवा संदीप आवळे, पो.हवा सचिन घोरपडे, पोना मालोजी चव्हाण, पो.ना पंकज ढाणे, पो.ना राजु शिखरे, पो.ना तुकाराम पवार, पो.ना शिंदे, पो.ना सतिश बाबर, पो.शि. गजानन फडतरे, पो.शि. शिवाजी डफळे, पो.शि. रोहीत बाबर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.हवा शरद बेबले, पो.हवा लैलेश फडतरे, पो.ना अरुन पाटील, पो. शि राहीत निकम यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.