वणव्याच्या भडक्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीतील हजारो हेक्टर क्षेत्र खाक

0
655
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | अज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले. तर तब्बल ५ तास मान्याचीवाडी येथील नागरिकांनी आगीशी संघर्ष करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नकेला आणि त्यांना यश आले. मात्र, वणव्यात हजारो झाडे होरपळल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी मस्करवाडी या ठिकाणी डोंगरात लावलेला वणवा आंब्याच्या बागेमध्ये घुसल्याने सुमारे दीड हजार झाडे होरपळली होती. तर या विभागात असलेले डोंगर परिसरातील वनविभागाचे हजारो हेक्टर क्षेत्रातील वनसंपत्तीचे वणव्यामुळे नुकसान झाले. दरम्यान, मान्याचीवाडी नजीक शिवारात गुरुवारी दुपारच्या सुमारास वणवा लागल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले. दुपारच्या सुमारास लागलेल्या या वणव्याचा भलताच भडका उडाला.

बघता बघता संपूर्ण शिवारात वणवा पसरला. यामध्ये शिवारात असलेला चारा तसेच पिकांचेही मोठे नुकसान झाले तर शिवारात असलेल्या आंबा, चिकू त्याचबरोबर देशी प्रजातीच्या झाडांचेही होरपळून मोठे नुकसान झाले. शिवारामध्ये असलेले चाऱ्याचे गवत सुकलेले असल्याने वणव्याचा मोठा भडका उडाला. प्रचंड वेगाने गावाचे दिशेने झेपावत असलेल्या वणव्याला येथील महिला पुरुषांसह तरुणांनी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरातून त्याचबरोबर काही बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसून या वणव्यावर मात करण्याचा तब्बल पाच तास प्रयत्न केला. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वणवा थोपवण्यात ग्रामस्थांना यश आले.