सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या विलासपूरमध्ये चोरट्यांनी सहा ठिकाणी धुमाकूळ घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन अपार्टमेंट व तीन सोसायट्यांमधील दारांचे कडी-कोयंडे तोडून सोन्याचे दागिने, रोकड यावर डल्ला मारला.
देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्तीही चोरट्यांनी चोरल्या. यादरम्यान, एकजणाने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी त्याला दांडके फेकून मारले. या हल्यात संबंधत मुलगा जखमी झाला असून या चोरीच्या घटनेमुळे विलासपूर परिसर हादरून गेला आहे.
विलासपूर हे महामार्गालगत सातारचे उपनगर असून, या भागात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. रविवारी रात्रीही चोरट्यांनी विलासपूरला टार्गेट केले. मध्यरात्री १ ते ३ या वेळेत चोरट्यांनी पहाटे मराठा पॅलेस, गजानन गार्डन अपार्टमेंट, वंदना अपार्टमेंट, सहजीवन सोसायटी, कोयना गृहनिर्माण सोसायटी व साई सोसायटीमध्ये धुमाकूळ घातला.
चोरट्यांनी मराठा पॅलेससमोरून एक मोटारसायकल चोरून नेल्याचेही सांगितले जात ई आहे. सहजीवनमध्ये दत्तात्रय महामुनी यांच्या बंद रूमचा कडी-कोयंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने, देव्हाऱ्यामधील चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरून नेल्या. त्या दरम्यान बारटक्के यांच्या घराकडेही चोरट्यांनी मोर्चा वळवला. चोरटे घराकडे येत असल्याचे त्यांच्या मुलाने पाहिले. खिडकीतूनच त्याने चोर चोर म्हणून आरडाओरडा केला. त्यावेळी एका चोरट्याने दांडके फेकून मारल्यामुळे या मुलाच्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला आहे.
याच सोसायटीमधील घोरपडे के यांच्या घरीही चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील लोक जागे नि झाल्याने चोरट्यांनी कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटीकडे मोर्चा वळवला. तेथील फाटक यांच्या घराची बंद खोली फोडून रोख ५५ हजार रूपये चोरून नेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.घटनांची माहिती सातारा शहर डे पोलिस स्टेशनला समजताच ठसे तज्ञासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. परंतु चोरट्यांचा सुगावा व लागला नाही. या घटनांमध्ये किती . सोने-चांदी, रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस ठाण्यात या घटनांची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.