मायणीत भरदुपारी घरफोडी; चोरट्यांनी 4 तोळे सोन्यासह 50 हजार रुपये केले लंपास

0
341
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मायणी येथील वडूज रस्त्यालगत पावकता भागातील एका घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे चार तोळे सोन्यासह ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी कि , मायणी येथील वडूज रस्त्यालगत पावकता भागात शिवाजी कोंडिबा मासाळ हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेत चोरट्यांनी घराच्या मालकांची काळजी घेतली नाही आणि भर दुपारी ही चोरी केली.

घटना घडल्यावेळी मासाळ कुटुंबीय शेतामध्ये काम करत होते. त्यांचा मुलगा अर्जुन ट्रॅक्टर घेऊन परतला तेव्हा चोरट्यांना त्याच्या येण्याची खात्री झाली आणि ते पळून गेले. अर्जुनने चोरट्यांच्या दिशेने दगड फेकले, मात्र ते त्यांच्या दुचाकीवरून विट्याच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला बोलावले, मात्र अद्याप कोणतीही दिलासादायक माहिती मिळाली नाही. पाच महिन्यांपूर्वी याच भागात आनंदा माने यांच्या घरीही चोरी झाली होती, त्यावेळी नऊ तोळे सोने चोरले गेले होते. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही, ज्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे आहे.