उंडाळेत चोरट्यांचा किराणा मालाच्या दुकानावर डल्ला; 30 हजार किमतीचे साहित्य लंपास

0
770
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात उंडाळे भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उंडाळे येथील मुख्य क्रांती चौकातील किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी मध्यरात्री फोडून सुमारे ३० हजार रुपयांच्या किराणा मालाची चोरी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठ दिवसापासून उंडाळे व परिसरात चोरट्यांकडून सातत्याने छोटी-मोठी दुकाने टार्गेट केली जात आहेत. आजपर्यंत चार ते पाच दुकानाची शटर उचकटून चोरट्यांनी चोरी केली. परंतु मंगळवारी रात्री मात्र चोरट्यानी हद्दच केली. उंडाळेतील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकातील दिलीप आडके यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातील साहित्याची चोरी केली. याशिवाय पोलीस स्टेशनला लागून असलेल्या कोंबड्यांच्या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला.

क्रांती चौकातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून तीन चोरटे तीन दुचाकीवरुन आलेले दिसून येत आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येते. चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे.