सातारा प्रतिनिधी | देवीच्या मंदिरातील सोने
चोरणाऱ्या संशयितास बोरगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले. अनिल अशोक धुमाळ (मूळ रा. कार्वे, ता. कराड, सध्या रा. सासपडे, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19/11/2024 रोजी रात्री 09.30 वा. ते दिनांक 20/11/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. चे दरम्यान मौजे सासपडे ता. जि. सातारा गावचे हददीतील गोसावी वस्तीतील महालक्ष्मी मंदीरातील देवीचे अंगावरील 02 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वाटयासह असणारे डोरले 15000/- रु. किंमतीचे हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेहले बाबत बोरगांव पोलीस ठाणेत दिनांक -23/11/2024 रोजी 00.10 वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हाचे अनुषंगाने बोरगांव पोलीस ठाणेचे श्री. रविंद्र तेलतुंबडे सहा. पोलीस निरीक्षक यांनी बोरगांव पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पो. ना. प्रशांत चव्हाण, पो. काँ. अतुल कणसे, पो. कॉ. केतन जाधव यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे डी. बी. पथक पोलीस ठाणे हददीत पेट्रालिंग करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अनिल अशोक धुमाळ रा. सासपडे ता. जि. सातारा हा सासपडे गावात देवाचे (जागरण गोंधळाचे) कार्यक्रम करतो. तो 2-4 दिवसापुर्वी गावातील गोसावी वस्तीतील महालक्ष्मी मंदीरात येत होता. त्यानंतर तो 2 दिवसापासुन गावात दिसला नाही अशी माहीती मिळाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम हा गणेशखिंड करंजोशी गावचे बस थांब्याजवळ आडोश्यास उभा असलेला दिसला म्हणुन डी. बी. पथकाने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अनिल अशोक धुमाळ रा. सासपडे असे सांगितले.
त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता घडले गुन्हाची कबुली दिली. त्याची अंगझडती घेतली असता गुन्हातील चोरीस गेलेला मुददेमाल त्याचे कब्जात मिळुन आलेने त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन गुन्हातील मुददेमाल जप्त करण्यात आलेला असून त्यास सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई ही समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अतुल कणसे, केतन जाधव यांनी केलेली आहे. सदर गुन्हाचा तपास पोलीस हवालदार मोहन चव्हाण हे करीत आहेत.