कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीस वडुज पोलिस ठाण्यातील पोलीसांनी आज अटक केली. कराड येथील कार्वे नाका येथे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.
इब्राहीम अबास अली शेख (वय २५, रा.सुर्यवंशी मळा कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडुन आरोपीने आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच दि. १५ रोजी दुपारी तडवळे येथील नवनाथ मूरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला.
कपाटातील ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरुननेल्याने अज्ञात चोरट्यां विरूध्द वडुज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक आणि गोपणीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हाआरोपी इब्राहीम अबास अली शेख याने केले असल्याची माहिती प्राप्त झाली. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड, कडेगाव याठिकाणी सतत 3 दिवस अहोरात्र सध्या वेशातील संशयीत इब्राहीम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवरुन त्याचे मूळ गावी विजापूर राज्य – कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाली.
त्याचा कराड येथील कार्वे नाका परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून सखोल व बारकाईने विचारपूस केली. त्यानंतर त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यास अटक करुन चोरीस गेलेले मणी मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची बोरमाळ, कानातील सोन्याचे झूमके व वेल, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम आणि सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम असा गुन्हयातीलएकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज व ७०००/ – रोख रक्कम असा दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीविरुष्द यापूर्वी कराड तालुका, उंब्रज, ढेबेवाडी पोलीस स्टेशनजि.सातारा तसेच कासेगाव, विटा, चिंचणी वांगी जि.सांगली व कोडोली जि.कोल्हापूर येथेघरफोडीचे एकूण ७ गुन्हें दाखल आहेत. सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, श्रीमती अश्चिनी शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली मोरे, रामचंद्र कांबळे, पो.उ. नि.रणधीर कर्चे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, शशिकांत काळे, अमोल च्हाण,किरण चव्हाण, मोहन नाचण, प्रमोद चव्हाण, गजानन तोडकर, प्रशांत ताटे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सत्यवान खाडे, जयदिप लवळे, प्रिती पोतेकर, दिनानाथ जाधव,अमोल निकम व पोलीस पथक यांनी केली आहे.