सातारकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून होणार पाणीकपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव, धरणांमध्ये मोबल्क पाणीसाठा झाला आहे. सातारकरांना पाणीपुवठा करणाऱ्या कास धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे.

शहापूर योजनेसाठी महावितरणच्या शेंद्र उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड होऊन शहापूरचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. तर कास योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे कासमधूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही.

दरम्यान, सातारा शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने वीजपुरवठ्यातील दोष दूर करून जलवाहिनीची गळती काढण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे कास आणि शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे. पालिकेने याबाबत वेळापत्रक तयार केले असून 16 ऑगस्टपासून पाणीकपात सुरू होणार आहे.

जाणून घ्या पाणी कपतीचे वेळापत्रक

१) सोमवार : भैरोबा टाकी, मंगळवार: व्यंकट पुरा टाकी,
२) बुधवार : कात्रे वाडी टाकी आणि घटेवाडी,
३) गुरुवार: गोल टाकी मेन लाईन (निळी, दुसरा झोन सकाळी सात ते आठ), ४) शुक्रवार: मेन लाईन गोल टाकी ( निळी पहिला झोन) सकाळी सहा ते सात, ५) शनिवारी: कोटेश्वर टाकी,
६) रविवारी: कोपरी लाईन, गुजर आळी लाईन गुरुकुल टाकी