सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल काल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू झाली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात जशी महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे तशीच जिल्ह्यात देखील होणार हे नक्की. निवडणुकीचं बिगुल वाजले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधीकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात उमेदवाराची घोषणा कधी होणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदरसंघात विद्यमान आमदार अन् इच्छुकांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. मात्र, यामध्ये विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हे नक्की.
अशा प्रकारे होऊ शकतील संभाव्य लढती
1) सातारा विधानसभा मतदार संघ (Satara Assembly Constituency) : सातारा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून यावेळी पुन्हा पाचव्यांदा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून आमदार दीपक पवार, अमित कदम (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन मोहिते (उद्धवसेना) हे असतील
2) पाटण विधानसभा मतदार संघ (Patan Assembly Constituency) : पाटण विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्यजित पाटणकर अशी लढत होईल. पाटण विधानसभा मतदार संघात शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर हे पारंपरिक विरोधक आहेत.
3) कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ (Karad South Constituency) : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते अतुल भोसले अशी लढत होणार आहे.मात्र, यावेळेस दोघांचाट देखील काटे कि टक्कर पहायला मिळणार हे नक्की.
4) कराड उत्तर विधानसभा मतदार संघ : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहे. त्यांच्याभाजपमधील दोन नेते इच्छुक आहेत. त्यामध्ये एक धैर्यशील कदम आणि दुसरा मनोज घोरपडे होय. या दोघांपैकी एकास उमेदवारी मिळणार आहे. विशेष म्हणजे या दोघांनी देखील दिलजमाई केली असून पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी निवडणुकीत काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
5) कोरेगाव विधानसभा मतदार संघ : कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महेश शिंदे विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे हे उमेदवार असतील. कोरेगाव मध्ये महेश शिंदे यांचे पारडे जरी जड असलं तरी या ठिकाणी शशिकांत शिंदे याच्या पाठीशी सर्वसामान्य आहेत.
6) वाई विधानसभा मतदार संघ : वाई विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटील विरुद्ध काँग्रेसमधून विराज शिंदे अशी लढत होऊ शकते. मात्रहा मतदार संघ महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याने या ठिकाणी शरद पवार जो उमेदवार देतील तो असेल.
7) फलटण विधानसभा मतदार संघात : फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला आहे. या ठिकाणी अजित पवार यांनी जाहीर केल्याचं उमेदवाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अजित पवारांच्या पक्षातील आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली आहे. तसेच येथील मतदार संघातील जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनीही पक्षांतर केले आहे. या ठिकाणी दीपक चव्हाण विरुद्ध भाजकडून सचिन कांबळे पाटील अशी लढत होईल
8) माण विधानसभा मतदार संघ : माण विधानसभा मतदार संघात भाजपकडून जयकुमार गोरे उमेदवार म्हणून उभे असणार असून त्यांना काटे की टक्कर देण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप हे इच्छुक आहेत. या तिघांपैकी अभयसिह जगताप यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.