Satara News : खंबाटकी घाटात पुन्हा झाली वाहतूक कोंडी; महामार्ग पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा मार्गावरील महत्वाचा असलेला खंबाटकी घाट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारणही तसे आहे. कारण या घाटात अलीकडच्या काळात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, आज शनिवारी सकाळी सातारा बाजूकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातील पायथ्याला ट्रक – कंटेनर बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, कंटेनर व ट्रक बाजूला घेत वाहतूक बोगदामार्गे वळवण्यात आली. तसेच वाहतूक कोंडी सुटल्यानंतर बोगद्याकडे वळवलेले वाहने पुन्हा जैसे थेमार्गाने सोडण्यात आली.

शनिवारसह सलग सुट्टी असल्यामुळे पर्यटक व प्रवाशांची संख्या वाढली असून अजूनही घाटात वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. यावेळी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहतुकीची वाहने व्यवस्थित असल्याची तपासणी करत अशा वाहनावर विशेष लक्ष देण्याबाबत निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी अचानक खंबाटकी घाटात एक तर्क व कंटेनर बंद पडला. सकाळी घटना घडल्यामुळे सकाळच्यावेळी घाटमार्गे सुरु असणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळतात पोलीससही घाटमार्गाच्या पायथ्याशी दाखल झाले. पायथ्यालगत बंद पडलेल्या ट्रक व कंटेनरला महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साह्याने बाजूला केले.

क्रेनद्वारे ट्रक व कंटेनर बाजूला केल्यानंतर सातारकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पुण्याकडं जाणारी वाहतूक सुरळीत आहे. शनिवार-रविवार व मंगळवारी दसरा असल्यामुळं सोमवारीची सुट्टी घेऊन अनेकजण गावी ये-जा करत असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.