एकाच रात्रीत 15 हून अधिक गाड्यांचे फुटले टायर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान सातारा हद्दीतील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे असून यामधून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. शनिवारी या महामार्गावर एकाच रात्रीत तब्बल 15 हून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाहनचालकांच्यातून संतापही व्यक्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगत चाहूर हा परिसर आहे. या परिसरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शनिवारी रात्री या महामार्गावरून काही गाड्या निघाल्या असताना त्यांचे टायर पंक्चर झाले तर काहींचे फुटले. सुदैवाने यावेळी कोणती अपघाताची घटना घडली नाही.

या ठिकाणी महामार्गाची खड्ड्यामुळे झालेली दुरावस्था पाहिल्यानंतर वाहन चालकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये जाऊन अपघात होऊ नये यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या पोलिसांच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत.