सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील बोरीव या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशनच्या कार्यक्रम अंतर्गत नवीन पाणीपुरवठा नळ पाइपलाईन योजनेच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच राजेंद्र पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली.
बोरीव गावात सुरू करण्यात आलेल नळ पाईपलाईन योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सामजिक कार्यकर्ते श्री. संतोष दत्तु पोळ, राजेंद्र नारायण पोळ, गोविंद शिवराम पोळ, शिपाई अमोल पोळ यांच्यासह गाव ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील बोरीव येथे जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुमारे ३० लाख ९० हजार ९९५ रुपये खर्च मंजूर झाला आहे. या खर्चातून गावात नवीन नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत नवीन पाईप लाइनचे काम सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत गावात अनेक विकासकामे करण्यात आलेली आहे. तसेच गावातीळ ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक आरोग्यदायी उपक्रम राबविले जात आहेत.