सातारा प्रतिनिधी । जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव तालुक्यातील परतवडीये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गावातील सर्व महिलांनी महिला दिन नियोजन करून महिला दिन साजरा केला. यावेळी महिलांचे आरोग्य, लहान मुलाचे संगोपण, विधवा प्रथा बंद करणे, तीन दिवसाचे सुतक पाळणे या महत्वाच्या विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सर्व महिलांनी विधवा प्रथा आणि तीन दिवसांचे पाळले जाणारे सुतक या दोन्ही प्रथा बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
महिला दिनानिमित्त परतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावचे सरपंच उमेश दिसले, उपसरपंच माधुरी दिसले, सदस्या शशिकला दिसले व गावातील सर्व महिला तसेच वरिष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी काही महिलांनी आरोग्य विषयी जनजागृती करून कार्यक्रमास उपस्थिती लावलेल्या महिलांमध्ये जनजागृती केली.
तर काही महिलांनी मुलांचे संगोपन व कौटुंबिक संगोपन याविषयी माहिती देऊन महिलांचा ज्ञानामध्ये भर टाकली. यामध्ये महिलांनी महिलांच्या विषयी जनजागृती करून महिलांनी आपल्या कुटुंबास कशा प्रकारे प्रोत्साहन करून कुटुंबाला योग्य मार्गाने घेऊन जाणे यासाठी विशेष मार्गदर्शन केले.