कराड प्रतिनिधी | सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यातच नेत्यांचे वाढदिवस देखील धुमधडाक्यात साजरे होत आहेत. राज्यातील अशाच एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीतील विजेत्या बैल जोडीच्या मालकांना कराडमध्ये 1BHK फ्लॅट देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथे या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीतील कासेगाव मध्ये रंगणार आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल दाहीगडे यांनी 17 रोजी या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. यापूर्वी बैलगाडी शर्यतीच्या प्रथम विजेत्यास थार गाडी देण्यात आली होती. त्यानंतर आता भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत पार पडणार आहे. या बैलगाडी शर्यती मधील विजेता बैल जोडीच्या मालकांना कराडमध्ये 1 बीएचके फ्लॅट देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात ही बैलगाडा शर्यत होणार आहे. आता पर्यंत बैलगाडी विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत. मात्र यंदा बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क वन बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला ७ आणि ५ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीतील इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून २०० हून अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत. या बैलगाडा स्पर्धेसाठी 10 एकरांवर मैदान तयार करण्यात आले आहे. त्याच १ लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे.