उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला; ‘इतके’ टक्केच पाणी शिल्लक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाच दिवसांपासून वळिवाच्या पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार ऊन पाऊस बरसत असला तरी काही धरणातील पाणी साठा मात्र, खालावला आहे. सातारा, माण आणि खटाव तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला असून धरणात सध्या १ टीएमसीपेक्षाही कमीसाठा आहे. ९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील भागाला पाणी पुरवठा हा उरमोडी धरणाच्या माध्यमातून होतो. या धरणाची पाणी साठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर अनेक गावच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच साताऱ्यासह माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजनांनाही पाणी सोडण्यात येते. गेल्यावर्षी परळी खोऱ्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते.

त्यामुळे उरमोडी धरणात अपुरा पाणीसाठा झाला होता. अशातच माण आणि खटाव तालुक्यांतही कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. परिणामी, धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे.