चाकूचा धाक दाखवून ‘त्याने’ परप्रांतीय इसमाचे 10 हजार रुपये हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून एकाने परप्रांतीय इसमाकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना वाई तालुक्यात घडली होती. या घटने प्रकरणी वाई पोलिसांनी एकास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे गु.र.नं ९९/२०२४ भा.द.वि.सं ३९२,५०६ प्रमाणे वाई पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गणपती घाटाजवळील गुरेबाजार झोपडपट्टी येथील सागर सुरेश जाधव (रा. गुरेबाजार झोपडपट्टी ता. वाई) हा असुन तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने यातील फिर्यादी नामे आबिद साबीर अन्सारी (रा. बिहार, सध्या रा. बोपोर्डी ता. वाई, जि. सातारा) यास चाकुचा धाक दाखवुन त्याच्या खिशातुन १० हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली आहे.

सदर आरोपीवर यापूर्वी वाई पोलीस ठाणे येथे मालमत्तेविरुध्दचे तसेच शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना वाई तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना दिल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस करता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशातुन रोख रक्कम १० हजार रुपये व चाकु जप्त करण्यात आला. तसेच त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, पोलीस उप-निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, पो.कॉ राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत, शिंदे, श्रावण राठोड, धिरज नेवसे, गोरख दाभाडे विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी वाई तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.