सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सातारा शहरात बुलेटसह इतर दुचाकी गाड्यांच्या इंजिनमध्ये आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ मोठ्याने आवाज करत काही दुचाकीस्वारांकडून ध्वनी प्रदूषण केले जात होते. याबाबत वाहतूक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी देखील मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आज सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्यावतीने सुमारे ५६ दुचाकीस्वारांवर कारवाई करत दीड लाख रुपये किमतीच्या सायलेन्सर व हॉर्न जप्त करण्यात आले. तसेच सायलेन्सर व हॉर्नवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसापासून कर्णकर्कश हॉर्नमुळे सातारा शहरातही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा होता. या टत्रासाकडे पोलिसांकडून कधी लक्ष दिले जाणार? मोठं मोठ्याने हॉर्न वाजवणाऱ्या तसेच चुकीच्या पद्धतीने सायलेन्सर बसविणाऱ्यांवर कारवाई कधी केली जाणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. या दरम्यान, काही नागरिकांनी वाहतूक शाखेशी संपर्क साधत तक्रारी केल्या असता वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वतीने काही दिवसांपासून धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमी अंतर्गत सुमारे ५६ अशा बेकायदेशीपणे बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यातील सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.
साताऱ्यात वाहतूक पोलिसांनी दीड लाखांच्या 56 सायलेन्सरसह हॉर्नवर फिरवला बुलडोझर pic.twitter.com/wVxlcY2uP7
— santosh gurav (@santosh29590931) March 23, 2024
सातारा येथे सहाय्यक पोलीस निरिक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या वतीने बेकायदेशीररितीने सायलेन्सर वापरणाऱ्या व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे दीड लाखांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. हे सिलेन्स आज वाहतूक पोलिसांच्या वतीने नष्ट करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या वतीने या पुढे देखील अशा प्रकारची कारवाई सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.