कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
कराड तालुक्यात बिबट्याने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. नदीकाठी असलेल्या तसेच डोंगराकडेला असलेल्या गावात घुसून बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. कराड तालुक्यातील काले परिसरात बिबट्याने रविवारी सर्वत्र धुमाकूळ घातला असून रात्री संभाजी यादव यांच्या गोठ्यात असलेल्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यादव यांच्या गोठ्यामध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यावेळी बिबट्याने गोठ्यात असलेल्या कुत्र्यांवर हल्ला करत एका कुत्र्याला उचलून पळून नेले. संभाजी यादव यांच्या गोठ्यामध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे
मागील महिन्यात 13 डिसेंबर रोजी कराड-चांदोली मार्गावरील घोगावमध्ये मोकळ्या शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून बिबट्यानं 13 मेंढ्यांचा फडशा पाडला. एका शेतकऱ्यानं पाटील मळी नावाच्या शिवारात मेंढ्या बसवल्या होत्या. सातारा जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. महाबळेश्वर-आंबेनळी घाटात बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत आहे. शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री एक गवा चक्क पुणे-बंगळुरू महामार्गावरच आला होता. तर अजिंक्यतारा किल्ल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपेठेत दोन वेळा तरसाचे दर्शन झाले होते. रस्त्यावरून फिरणारा तरस सीसीटीव्हीत कैद झाला आहे.