कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजिक तीन कोटी रुपये लुटल्याची घटना घडली होती. या दरोडा प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आसिफ सलिम शेख हा कराड शहर पोलीस स्टेशनला स्वतःहन हजर हाजर झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दहा जणांना अटक केली आहे. दहा आरोपी कडून दोन कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये हस्तगत केल्यानंतर पुन्हा केलेल्या तपासात आणखी साडेचार लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईहून हुबळीकडे तीन कोटी रुपये घेऊन निघालेली कार कराड नजीकच्या मलकापूर येथे अडवून लूट केली होती. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तपास करून १० संशयतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९५ टक्के रक्कम हस्तगत केली होती.
मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. १५ आक्टोंबर रोजी पहाटे ही पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नाजिक मलकापूर येथे ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील फरार आसिफ सलिम शेख रा. शिंदे गल्ली कराड हा स्वतःहून कराड शहर पोलीस स्टेशनला आज सायंकाळी उशिरा हजर झाला आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार हे करीत आहेत.