सातारा प्रतिनिधी । पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि एसटी बसची भीषण अपघाताची घटना नुकतीच घडली. या महामार्गावर रायगाव फाटा परिसरातील कुसुम पेट्रोल पंपाजवळ समोरील ट्रकला पाठीमागून एसटी बसने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की बसमधील चालकासह चौघेजण गंभीर जखमी झाले.
अपघातात बसचा चालक तुषार तानाजी साठे ( वय 30, रा. मासोली ता. कराड), बसमधील प्रवासी सदाशिव रामचंद्र गोरड ( वय 76, रा. दिडवाघवाडी ता. माण), संतोष दाजी काळेल (वय 41), सौ वर्षा संतोष काळेल (वय 38 , दोघे रा. वळई ता. माण) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई सेंट्रलवरून कराड डेपोची एसटी बस (एमएच 14 केक्यू ०४०१) ही पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कराडला निघाली होती. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात एसटी बस आली. तेव्हा अचानक एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बसने समोर जात असलेल्या ट्र्क (जीए ०५ टी ७४२३) ला पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत बसचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बसमधील चारजण जखमी झाले. जखमींना सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. नि. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. मोरे, पो. ह. वायदंडे करत आहेत