सातारा जिल्हा परिषद भरतीचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु…; पहिल्या टप्प्यात 8 संवर्गासाठी झाली परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद वर्ग 3 ची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ सहाय्यकांची झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 8 संवर्गाच्या या परीक्षेनंतर आता उद्या दि. 15 आॅक्टोबरपासून परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील रिक्त ९७२ जागांसाठी नोकर भरती होत आहे. यासाठी विविध विभागातील २१ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेतील नोकरीसाठी ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ८ संवर्गासाठी परीक्षा झाली. यामध्ये रिंगमन (दोरखंडवाला), लेखा वरिष्ठ सहाय्यक, सांख्यिक विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा झाली.

तर दि. ११ रोजी तीन संवर्गासाठी परीक्षा झाली. यामधील लघुलेखक निम्नश्रेणीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज भरला होता. यातील एकजण गैरहजर राहिल्याने १० जण परीक्षेसाठी उपस्थित होते. लघुलेखक उच्चश्रेणीतही ११ जण अर्जदार होते. त्यातील आठजणांनी परीक्षा दिली. तर तिघेजण अनुपस्थित राहिले. तर लेखाच्या कनिष्ठ सहाय्यक संवर्गासाठी ३१० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील ५८ गैरहजर राहिल्याने २५२ जणांनी परीक्षा दिली. आता या नाेकर भरतीचा दुसरा टप्पा दि. १५ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. १५ आणि १७ आॅक्टोबरला परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील सातारा शहरात २ आणि कराड येथील एका केंद्रावर या परीक्षा होत आहेत.