पावसाळ्यात कासला फिरायला जातायं? ‘हा’ मार्ग आहे वाहतुकीसाठी पूर्णपणे दिवस बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अतिवृष्टी आणि भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा – यवतेश्वर – कास या घाटातील धोकादायक दरड कोसळल्यास मोठया प्रमाणावर जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी रविवार, दि. 23 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. दि. 23 जुलै रोजी रात्री 12 वाजलेपासून दि. 24 जुलै रोजीचे रात्री 12 पर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता खबरदारीची उपाययोजनेसाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदर दिवशी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक करावी.

सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड/दगड फोडण्याची कार्यवाही बाबत सूक्ष्म नियोजन करुन, सुरक्षिततेचे दृष्टीने सर्व प्रकारच्या योग्य त्या खबरदाऱ्या व उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.