पृथ्वीराजबाबांनी सुचवलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं थाटात उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाट्न झाले. मात्र, सदर प्रकल्प हा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात त्यांनी हा प्रकल्प सुचवलेला होता. सद्या हि दूरदृष्टी कोणाची होती याचा विसर आत्ताच्या आभासी दुनियेतील जनतेला पडलेला दिसत आहे.

मुंबईचे वाढते ट्राफिक यामधून पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस वे ला जलद पोहचण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मुंबई मधून बाहेर पडणारा फ्री वे व त्यालाच जोडणारा हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे दोन्ही पूल उभारण्याची संकल्पना होती ती तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती. या दोन पूल मधील ‘फ्री वे’ पूल पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाला पण समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंक या पुलाच्या कामाला पूर्ण होण्यास वेळ लागला व तो पूल आता सत्यात उतरतोय आणि त्याचे उदघाट्न पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच झाले

2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने हा पूल उभारण्याच्या सर्व मंजुरी पूर्ण करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे निधीच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला 2013 साली निधीची मंजुरी तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली व निधीची तरतूद सुद्धा झाली.

त्यानंतर फडणवीस सरकार व उद्धव ठाकरे सरकारच्या काळात या पूल उभारणीला गती मिळाली व आता या पुलाचे लोकार्पण होत आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रोजेक्ट असो किंवा मुंबईतील मोनोरेल प्रोजेक्ट असो असे अनेक मोठ्या शहराच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रोजेक्ट मंजुरी चे काम व ते सत्यात उतरविण्यासाठी ची कल्पना आणि डिझाईन सर्व काँग्रेसच्या काळातच झाले होते. ती कामे इतकी दूरदृष्टीची होती कि त्या प्रोजेक्ट चे उदघाट्न अजूनही भाजप सरकार करत आहेत पण कामे काही संपलेली नाहीत.

साधा विषय आहे ज्या प्रोजेक्ट ला मंजुरी मिळालीत व निधीची तरतूद झाली आहे ते प्रोजेक्ट थांबवता येत नाहीत ते पूर्ण होतातच पण त्यांचे उदघाट्न कोणाच्या काळात होतंय म्हणून आधीच्या दूरदृष्टी असणाऱ्या सरकारचे धोरण वाया जात नाही. पण आता केवळ गोदी मीडिया नव्हे तर ट्रॅव्हल ब्लॉग किंवा युट्युबरं लोकही याला ऑन कॅमेरा मोदीजी की व्हिजन, मोदीजींका सपना, मोदीजी के काल मे हुआ विकास वगैरे म्हणत आहेत. हा सगळा सोशल मीडिया आणि व्हॉटसअप विद्यापीठ टाईप उथळपणा आहे. काहीच सखोल माहिती, इतिहासात काय झाले वगैरे माहिती नसताना काहीही ऑन कॅमेरा ठोकून द्यायचे, अशी परिस्थिती आहे.