कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गहाळ झालेले एकूण ४ लाख ७६ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईलचा शोध घेतला. त्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यकी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र भोरे यांचे हस्ते नागरिकांना मोबाईल परत करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ मोबाईल तक्रारी बाबत गांभीर्याने लक्ष पुरवून जास्तीत जास्त मोबाईलचे शोध घेवून नागरिकांना परत करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. रविंद्र भोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पोलीस अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पो. कॉ. मयुर थोरात व इतर पोलीस अंमलदार यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून व सी. ई. आय. आर पोर्टल वरुन तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक माहितीचे विश्लेषन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचे तात्काळ शोध घेतला.
सातारा तसेच कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड जिल्ह्यातून एकूण २५ मोबाईलचा उंब्रज पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सातारा व इतर जिल्ह्यातून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण ४ लाख ७६ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल हस्तगत करुन मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ राजकुमार कोळी, पो. कॉ. प्रशांत पवार, तसेच सायबर पोलीस ठाणेचे पो कॉ महेश पवार यांनी केली आहे.