खून करून 7 महिन्यांपासून होता फरार; अखेर ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे – कोल्हापूर महामार्गाच्या हद्दीत वाढे फाटा नजिक सर्व्हिसरोड लगत सातारा येथील एकावर गोळीबार करत त्याचा खून केल्याची घटना ७ महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर अन्य २ आरोपी फरारी होते. त्यातील एकास अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाना यश आले आहे.

याबाबत पोलिसांकडून व घटनेतील फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४/०१/२०२३ रोजी रात्री ००.३० वाजण्याच्या सुमारास वाढे गावचे हद्दीत पुणे कोल्हापूर रोडवर सहिंस रोड लगत मयत अमित आबासाहेब भोसले रा. शुक्रवार पेठ सातारा यांचेवर अज्ञात इसमांनी मोपेडे मोटार सायकलवर येवून गोळीबार करुन त्यांचा खून केला. या घटनेनंतर सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं. ३२/२०२३ भादविक ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयामध्ये ५ आरोपींना अटक करण्यात आली असून २ आरोपी फरारी होते.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत
माहिती प्राप्त झाली की, नमुद गुन्हयातील दोन फरारी आरोपींपैकी एक आरोपी दहिवडी ता. माण जि. सातारा येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुशंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक तयार करून त्यांना नमुद आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने दहिवडी येथे जावून फलटण चौक दहिवडी परिसरामध्ये सापळा लावून फरारी आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी सातारा तालूका पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, लैलेश फडतरे, शरद बेचले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार, अमित माने, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.