सातारा प्रतिनिधी । एकीव धबधबा परिसरात दोन युवकांना ढकलून दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 72 तासाच्या आत गजाआड केले होते. मात्र, एक संशयित फरार होता. त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या आरोपीस बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. ओमकार उर्फ सोनू साबळे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकीय धबधब्याजवळ दरीमध्ये दोघांना ठकलून देवून केलेल्या दुहेरी खुनाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी हा गुन्हा उघड करण्याच्या सुचना मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष तासगांवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार यापुर्वीच या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करुन पुढे तपास सुरु होता. परंतु गुन्ह्यातील त्यांचा चौथा साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्याबाबत वरीष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्यानुसार या आरोपीचा पोलीस ठाण्याचे खास पथक तयार केले. या पथकास संबंधित आरोपी राहत असलेला ठाव ठिकाण्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने संबंधित आरोपीचा शोध घेत शोध त्यास अटक केली.
या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि संतोष तासगांवकर करीत आहेत. या कारवाईमध्ये वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली मेठा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तासगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स.पो.फी, गंगावणे, सनी काळे, दिगंबर माने, सागर मोरे, सुरज वाघमळे यांनी सहभाग घेतला.