आरक्षणाबाबत शिवेंद्रराजे भोसलेंनी सुचवला ‘हा’ पर्याय; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्याबाबत साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एक मोठं विधान करत मार्ग देखील सुचवला आहे. एक ना एक दिवस देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. संसदेलाही तसा निर्णय घ्यावा लागेल. ज्याचे उत्पन्न कमी त्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो की, मागासवर्गीय असो. तो लाभ त्याला मिळायला हवा तरच आरक्षणाचा तिढा सुटेल, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले केले.

सावर्डे येथील एका कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी आ. शेखर निकम, एमपीएससीचे माजी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, सुभाष राजेशिर्के, शिरकाई प्रतिष्ठानचे दत्ताजी राजेशिर्के, मार्केटयार्डचे सभापती विक्रम पवार, शिरकाई प्रतिष्ठानचे सुनील राजेशिर्के, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसिंह राजेशिर्के, जिल्हा परिषद माजी सदस्य निकिता सुर्वे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. भोसले म्हणाले की, उद्या एखाद्याला आरक्षण दिले की, दुसरा रूसणार आणि तिसरा आंदोलन करणार. त्यामुळे आरक्षणाचा तिढा तेढ निर्माण करणारा आहे. देशाच्या एकसंघतेला धोकादायक आहे.