सातारकरांचा नाद नाय करायचा…! 1 कोटीच्या पुढची आहेत 7 वाहने

0
1307
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बदलत्या काळानुसार आता सातारकर देखील बदललेले आहेत. इम्पोर्टड वाहन आणि सातारकर यांचे एक वेगळेच समीकरण बघायला मिळत आहे. सातारा शहरात अनेक महागडी इम्पोर्टेड वाहने असताना २०२४ वर्षामध्ये तब्बल १ कोटीच्या पुढील किमतीची तब्बल ७ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तर १५ लाखांच्या पुढील चारचाकी वाहने ९५८ खरेदी करण्यात आली आहेत.

सातारा प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची नोंद देखील आहे. सातारा शहरातील अनेक लोकांकडे आलिशान महागडी वाहने असून, अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढताना दिसून येत आहे. हौसेला मोल नाही, हेच यावरून दिसून येत आहे.

महागड्या दुचाकींसाठी आटापिटा…

उद्योजक, राजकीय व्यक्ती यांच्यामध्ये आलिशान महागड्या कारची क्रेझ आहे, त्याप्रमाणे तरुणांचा महागड्या इम्पोर्टेड दुचाकी घेण्यासाठी आटापिटा असतो. लाखो रुपयांच्या इम्पोर्टेड दुचाकी रोज शहरातील रस्त्यांवर धावत असतात. स्पोर्टस बाइक घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. कमी सीसीच्या (क्षमतेच्या) दुचाकी वापरणे तरुणांना आवडत नसल्याचेदेखील दिसून येते

जिल्ह्यात उद्योगपतींकडे ‘या’ आलिशान मोटारी

सातारा जिल्ह्यातील जवळपास बहुतांश उद्योजकांकडे आलिशान कार आहेत. स्टेटस सिम्बॉल म्हणून या वाहनांकडे बघितले जाते, जेवढी महागडी कार तेवढी मोठी व्यक्ती, असे समीकरणच बनले असल्याने, प्रत्येक जण आपले स्टेटस जपण्यासाठी महागडी वाहने खरेदी करण्यावर भर देत आहेत. इम्पोर्टेड इलेक्ट्रिक वाहनेदेखील भारतात दाखल होत आहेत. इलेक्ट्रिक महागडी वाहने घेण्यातदेखील सातारकर अग्रेसर आहेत. राजकीय नेतेमंडळी देखील यामध्ये मागे नसून, महागडी कार प्रत्येक राजकीय व्यक्तीकडे आहे. या वाहनांना असलेले नंबरदेखील लाखो रुपये भरून घेतले जातात.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेल्या कार

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनचे बरेच चाहते आहेत. आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी, बीएमडब्ल्यू अशा कार आहेत. त्यांनी २०२१ मध्ये पुण्यातून बीएमडब्ल्यू या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले यांच्या गाडीचा नंबरही 007 असा आहे. नव्या बीएमडब्लू कारला MH 11DD 007 हाच नंबर घेतला आहे. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही कार आहे.