सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला?; शिवेंद्रराजे भोसले-मकरंद आबांच्या नावांची चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार करत ८ विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. निवडणुकीत यश मिळवलेल्या आठ पैकी चार आमदारांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. पवारांचा बालेकिल्ला हादरविणाऱ्या या चार शिलेदारांच्या खांद्यावर आता राज्याच्या विविध खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी पडली आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या चर्चा सुरु आहे ती पालकमंत्रीपदाची. होय जिल्ह्याचं पालकमंत्रीपद (Guardian Minister) कुणाला दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे.

अखेर उशिरा का होईना, पण महायुती सरकारच खातेवाटप जाहीर झालं. खातेवाटपाचं टायमिंग साधताना कोणी नाराज होणार नाही आणि त्या नाराजीचा परिणाम अधिवेशनावर होणार नाही, याची पुरेपूर दक्षता सरकार कडून घेण्यात आली. महायुतीच्या खाते वाटपावर नजर टाकली असता त्यामध्ये अनेक बड्या नेत्यांचं डिमोशन झाल्यास बघायला मिळालं, काही नव्या चेहऱ्याना महत्वाचे खाते देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून आधीच वगळण्यात आलंय, तर काही नेत्यांना मंत्रिपद तर मिळालं आहे, पण क्षमता असूनही तुलनेनं हलकं किंवा कमी महत्वाच्या खात्यांवर त्यांची बोळवण करण्यात आलीय आहे. नाव मोठं, पण मिळालेलं खात मात्र छोटं अशी अवस्था या नेत्यांची झालीय.

पालकमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता

सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्यामुळे पालकमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. पण मागील सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले शंभूराज देसाईसुद्धा यासाठी आग्रही आहेत. यावेळी सातारा जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल 4 मंत्रिपदं आली आहेत. त्यामुळं शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी एकाला साताऱ्याचं पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

नाव मोठं पण खातच होतं असं दुसरं नाव म्हणजे म्हणजे शंभूराज देसाई

शिवसेनेचे साताऱ्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचेही महत्व या मंत्रिमंडळात कमी झाल्याचे दिसून येत आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे पूर्वी उत्पादन शुल्क विभाग होता. तो आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आला असून तो खुद्द अजितदादांनी स्वतःकडे ठेवलाय. त्याऐवजी शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हे मंत्रालय देण्यात आलेले आहे. त्यामुळे मागील सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळालेल्या शंभूराज देसाई यांच्या वाटेलाही नव्या मंत्रिमंडळात तुलनेने कमी महत्वाचे खाते आल आहे.

पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी कशी?

सध्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील दिवंगत अभयसिंहराजे भोसले साताऱ्याचे पालकमंत्री होते. भाजपाचे चार आमदार जिल्ह्यातून विजयी झाल्याने भाजपाचे वर्चस्व आहे. शिवेसेनेचे शंभूराजे पालकमंत्री पदासाठी सर्वाधिक उत्सुक होती. मात्र, कालच त्यांनीपालकमंत्रीपदाबाबत केलेल्या एका विधानमुळे ते पालकमंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे दिसून आले. मात्र, मकरंद पाटील हे चौथ्यांदा विजयी असल्याने त्यांच्यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

शिवेंद्रराजे यांच्या रूपाने राजघराण्यातील तिसरी सार्वजनिक बांधकाम मंत्री

भाजपातून साताऱ्यातून राजघराण्याचे वारसदार आणि सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून गेलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील राजघराण्यातून सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी विधिमंडळात साताऱ्याचे बराच काळ नेतृत्व केले. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्रिपदही त्यांनी सांभाळले होते. त्यानंतर सेना-भाजपा युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने राजघराण्यातील तिसरी सार्वजनिक बांधकाम मंत्री झाली आहे.

अजितदादांनी शब्द पाळला, मोठा कॅबिनेटमंत्री तर लहान भाऊ खासदार

वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनि देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत मदत आणि पुर्नवसन मंत्रिपद मिळवल आहे. खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिले होते. त्यामुळे वाईत मोठा भाऊ कॅबिनेट आणि लहान भाऊ खासदार झाला आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदनराव पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मागील तीन टर्म आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. राज्यसभेचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या रिक्त जागी अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. आता मकरंद पाटलांना मंत्रिपद देऊन अजित पवार यांनी वाईकरांची मने जिंकली आहेत.

पाटणच्या शंभूराजेंना कॅबिनेटमंत्रीपद मात्र, पूर्वीच खातं गेलं

पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदारकीची हॅट्रिक मारली. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती, तर त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव शंभूराज देसाईंच्या गाठीशी असलेल्या शंभूराज देसाई यांनी देखील काल मंत्रिपद स्वीकारल्यानंतर मतदार संघात हजेरी लावली. मात्र, त्यांच्याकडे देण्यात आलेल्या नव्या खात्याच्या मंत्रिपदापेक्षा त्यांच्याकडून काढून घेतलेल्या उत्पादन शुल्क मंत्रिपदाचीच चर्चा सर्वाधिक केली जात आहार.

जयकुमार गोरेंना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार?

माण मतदार संघात विजयी चौकार मारणाऱ्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. त्यांना देखील ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. २००९ पूर्वी अनेक वर्ष हा माण मतदारसंघ राखीव होता. मतदारसंघ खुला झाल्यानंतर एका पोटनिवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गंभीर फौजदारी गुन्ह्यांमुळं आमदार गोरे हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांना महत्वाच्या खात्यासह सोलापूरच्या पालकमंत्री वर्णी लागण्याची शक्यता आहे.