साताऱ्यात 6 मतदार संघाचा तिढा सुटला मात्र, दोनचा घोळ कायम; भाजपकडून महायुतीत आणखी एकासाठी प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हातील आठ विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये अजूनही घोळ सुरू आहे. सहा मतदार संघाचा तिढा सुटला असला तरी फलटण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजून वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान, महायुतीकडून कराड उत्तर साठी प्रयत्न केले जात असून सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जागा आलेला भाजप हा मोठा ठरलेला आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपने सातारा, माण आणि कराड दक्षिणचा उमेदवार जाहीर केला आहे. तर शिंदेसेनेने पाटण आणि कोरेगावच्या शिलेदारांवर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही वाईचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता कराड उत्तर आणि फलटण मतदारसंघ मिळविण्यासाठी महायुतीत बोलणी सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यावर तोडगा निघेल, अशी शक्यता होती. मात्र, ती फोल ठरली असून उद्या होणाऱ्या बैठकीत तिढा सुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कराड उत्तर मतदारसंघाबाबत सांगायचे झाले तर या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला हा मतदारसंघ हवा आहे. याठिकाणी भाजपच्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊन जागा लढविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी आहे. त्यादृष्टीने अजितदादा गटाचे नेते नितीन काकांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. पण भाजपही या मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नसल्याने दोघांच्या रस्सीखेचीत मतदारसंघ वाटपाचे घोडे अडले आहे.

तर दुसरा मतदार संघ हा फलटण आहे. या ठिकाणी फलटण मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी राखीव आहे. मात्र, याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे उमेवार देण्याच्या तयारीत आहेत. पण याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार असलेल्या आमदार दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, उमेदवार मिळत नसल्याने या ठिकाणी या मतदार संघाची मागणी भाजपने केली असून त्याला हा मतदारसंघ हवा आहे.