सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी सातारा शहरात वास्तव्यास आहे. पीडितेच्या चुलत काकाने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अत्याचार केला. तसेच शेतातही नेऊन त्याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. याची माहिती मिळताच काकाने ‘हा प्रकार तू कोणाला सांगितलास तर तूला मारून टाकीन, तुमचे
घर जाळून टाकेन, अशी धमकी पुतणीला दिली.
त्यामुळे तिने हा प्रकार काही दिवस घरात कोणाला सांगितला नव्हता. मात्र, गरोदर झाल्याचे समजल्यानंतर तिने हा प्रकार घरात सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी तरुणीला घेऊन थेट सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. शुक्रवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात चुलत काकाच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे हे अधिक तपास करीत आहे.