सातारा जिल्ह्यातील ‘या’ रस्त्यावर कोसळली दरड; रात्रीत प्रशासनाकडून उपाययोजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असताना महाबळेश्वर तालुक्यातील घावरी – एरणे रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून शनिवारी देखील दरड हटवण्याचे काम सुरु होते.

धोम-बलकवडी धरणाात पाण्याची आवक वाढली असून वाढली असल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मोरेवाडी, ता. सातारा येथील आणखी 23 कुटुंबांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील घावरी ते एरणे रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरड कोसळली. याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हटवून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत केला. धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता २००० क्युसेक पाणी कृष्णा नदी पात्रात मध्ये सोडण्यात येणार आहे. बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.