सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात राज्य सरकारच्या वतीने अनेक प्रकल्प, उपक्रम राबविले जात आहेत. खासकरून कृषी क्षेत्रात औपक्रमाच्या म्हयमातून अर्थसहाय्य देखील केले जात आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव तयार केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या एका गावाकरिता साधारणतः ५४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार करून ग्रामस्थांनी मनावर घेतले तर ‘मधाचे गाव’ व्हायला वेळ लागणार नाही. सातारा जिल्ह्यात मांघर हे मधाचे गाव असून महाबळेश्वर तालुक्यातील सालोशी आणि वाई तालुक्यातील जोर ही गावे ‘मधाचे गाव’ बनण्यासाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग विभाग प्रयत्नशील आहे.
बदलत्या काळात आयुर्वेदिक उपचार, औषधी, सौंदर्यप्रसाधने, वजन कमी करणे, पोषक आहारामध्ये मधाचा प्रचंड वापर वाढत आहे, परागी भवन, पुनरुत्पादन आणि जैवविविधता टिकविण्यासाठी मधमाशी महत्त्वाची भूमिका बजावते परंतु रासायनिक कीटकनाशक व खतांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यामुळे मधमाशी संवर्धन आणि मध उत्पादनाच्या.
उत्पादनाच्या अनुषंगाने शासनाने ‘मधाचे गाव’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. निकषांची पूर्तता करणाऱ्या गावाने ग्रामसभेत मधाचे गाव योजना राबविण्याचा ठराव मंजूर करून तो ठराव जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला पाठविल्यानंतर पुढील कार्यवाही होते.
गावाला 54 लाखांचे अनुदान
मधाचे गाव या योजनेअंतर्गत निकषांनुसार निवड झालेल्या व योजनेची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या गावांसाठी ५४ लाख रुपयांपर्यंत सामुदायिक अनुदान मिळणार आहे. तसेच मधाचे गाव योजने अंतर्गत सहभागी लाभार्थ्यांना ९० टक्के राज्य शासनाचे अनुदान आणि दहा टक्के लाभार्थ्यांचा सहभाग या तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मधाचे किती १८ हजार किलो उत्पादन?
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनेतून सातारा जिल्ह्यात ४०० मधपाळांकडून मध संकलन केले जाते. आता पर्यंत पाहिले तर सातारा जिल्ह्यात १८ हजार किलो मध उत्पादन झाले आहे. उत्पादित केलेले मध खादी व ग्रामोद्योग मंडळ ४०० रुपये किलोने खरेदी करते. अनेक लाभार्थी त्यांच्या पातळीवर विक्री करतात.
प्रत्येक जिल्ह्यात एक ‘मधाचे गाव’
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथे प्रायोगिक तत्त्वावर मधाचे गाव उपक्रम राबविण्यात आला. त्यास ग्रामस्थांनी साथ दिली आणि गावाला पुरस्कारही मिळाले. मध उत्पादनाच्या संधी जास्त असल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.