सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील भुईंज परिसरात एक वर्षांपूर्वी विद्युत डिपीची चोरी केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेतील आरोपीचा एक वर्षांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान संबंधित आरोपीस स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली.
जानू प्रकाश भोसले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विदयुत डिपी चोरीच्या गुन्हयात असलेला आरोपी जानू प्रकाश भोसले रा. बिर्सिङ ता. जि. सातारा हा सन २०२२ पासून फरार होता. संबंधित आरोपी लींबखिड येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तपास पथकास सदर आरोपीस तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने तिबखिंड परिसरात सदर आरोपी याचा कोणत्याने शोध घेऊन त्याठिकाणी सापळा रचला. त्या ठिकाणी संबंधित आरोपी आला असता त्याला पकडून पुढील कारवाई करीता भुईंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
भुईंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि ३७९ सह भारताच्या विदयुत अधिनियम कलम १३६ नुसार एकुण ३ गुन्हे नोंद आहेत. तसेच्या या गुन्ह्यावरून संबंधित आरोपीस अटक केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक फौजदार सुधीर बनकर, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, राकेश खांडके, सचिन सा, अजित कर्जे, प्रविण कांबळे यांनी सहभाग घेतला आहे. सहभागी सर्व अधिकारी व अमतदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.