कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांची आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वनविभागास यश आले आहे. वनविभागाकडून रविवारी मध्यरात्री 1 वाजता रेस्क्यू ऑपरेशन राबविलेल्या मोहिमेचे दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना घडली होती. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्यासह ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला तातडीने याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने दुपारी 1 ते 3 या वेळेत बछड्यांना विहिरीतून बाहेर काढले होते.
रविवारी 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी बिबट्याच्या दोन्ही बछडे यांचे मादी बरोबर पूनरमिलन करण्यात वनविभागने प्रयत्न सुरू करत मोहीम राबवली व मध्यरात्री 1 वाजता मादी बिबट्या येऊन आपल्या पिल्लांना यशस्वीपणे परत घेऊन गेली. सदर मोहीम यशस्वी झाली.
विहिरीत पडलेल्या 'त्या' 2 बिबट्याच्या बछड्यांची वन विभागाने घडवली आईसोबत पुनर्भेट…
आई -पिल्लांच्या भेटीचा Video👇👇 pic.twitter.com/wj2tuY9BGd
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 4, 2023
बिबट्याच्या एक मादी तर एक नर जातीचे आणि साधारण 4 ते 5 महिने वय असलेल्या बछडांना पिल्लांना एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवण्यात आले व त्याचे दार तीन पूलीच्या सहायाने लांब बांधून ठेवण्यात आले. साधारणपणे पिंजरया पासून पुली ओढणारे 150 फूट लांब अंतरावर 20 फूट उंचावर होते. पिंजरा शेजारी हालचाल टिपण्यासाठी विशिष्ट कॅमेरे लावण्यात आले. मादी साधारण रात्री 1 वाजता पिंजरा शेजारी घुटमुळू लागली कॅमेरामध्ये दिसले. त्या क्षणी पुलीच्या साहय्याने दोर ओढून पिंजरा दार उघडुन पिल्लांना मादी जवळ मुक्त करण्यात आले.
या रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक कैलास सानप, सचिन खंडागळे, अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बेडेकर, वनसेवक भरत पवार , अमोल माने, धनाजी गावडे, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे, शशिकांत जाधव, प्राणीमित्र अजय महाडीक, उदित कांबळे, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे तसेच रेस्कु पुणेचे हर्षद, एजाज व पशसंवर्धन अधिकारी डॉ ज्योती यांनी सहभाग घेतला होता.