सातारा प्रतिनिधी । यंदा दिवाळी सणामध्ये फारशी थंडी जाणवली नसली तरी आता मात्र, गेली दोन-तीन दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या वातावरणातील या बदलांना सध्या सातारा जिल्हावासीय सामोरे जात आहेत. दिवसाही गारवा असून, पहाटे थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागली असून हिवाळा ऋतू असल्याचे वाटू लागले आहे.
तसे पाहिले तर गुरुवारपासून थंडी जास्त प्रमाणात वाढू लागली आहे. सध्या दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्याने गुलाबी थंडीने ग्रामीण भागात हुडहुडी जाणवत आहे. सकाळी अन् संध्याकाळी कानटोप्या मफलर, स्वेटर घालून लोक फिरायला जात आहेत. दिवसाही थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे अशा परिस्थितीचा अनुभव येत आहे.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत – अधूनमधून पावसाची परिस्थिती निर्माण होत होती. गेल्या दोन दिवसात – थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर वाढत आहे. गुरुवार पहाटेपासून थंडी चांगलीच थंडी पडत असून, हवेतही गारठा वाढला आहे. तापमानाचा पारा कमी होत असून, सकाळी अन् संध्याकाळी थंडी जाणवायला लागली आहे. आठवडा भरापासून सकाळच्यावेळी व सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाही कमालीची थंडी जाणवत असून थंडीपासून बचावासाठी लोकरीच्या कपड्यांना पारा मागणी वाढू लागली आहे. किमान अन् तापमानाचा पारा खाली घसरत आहे. खऱ्या अर्थाने आता हिवाळा सुरू पासून झाल्याचे जाणवत आहे.
वातावरण बदलाचा असाही परिणाम
थंडीच्या या बदलत्या वातावरणात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. यामुळे दमा व अॅलर्जीचा ब्रास असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. जास्त उष्मांक असलेले आणि पोषण देणारे पदार्थ या दिवसांत खाणे योग्य आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. याच बरोबरीने त्वचेची काळजी घेणेही आवश्यक असून, खाण्या पिण्यात बदल करणे गरजेचे आहे. नागरिकांनी या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.