सातारा प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला कासवरील फुलांचा बहर ओसरला असून, रंगोत्सव कमी झाला आहे. पठारावरील बहुतांश फुलांनी यावर्षीसाठी निरोप घेतला असून, काही दुर्मीळ प्रजातींच्या फुलांसह मिकी माऊसची पिवळी छटा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
यावर्षी पाच सप्टेंबरला हंगामाचा नारळ फुटला होता. महिनाभरात लाखो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला. यावर्षी चांगला पाऊस, अधूनमधून पडणारे ऊन यामुळे फुलांचे गालिचे पठारावर पाहायला मिळाले. विशेषतः सात वर्षांतून एकदाच फुलणारी टोपली कारवी यावर्षी मोठ्या प्रमाणात फुलली होती. पठारावर निळे गालिचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.
गतसाली पठाराला असणारी लोखंडी कुंपण काढल्यापासून गतसाली पठाराला असणारी लोखंडी कुंपण काढल्यापासून फुले मोठ्या प्रमाणात आजही बहरली आहेत. संपूर्ण तलाव पांढऱ्या शुभ्र कमळांनी बहरला आहे. त्यामुळे राजमार्गावर असलेल्या या तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांच्या रांगाच रांगा पाहावयास मिळाल्या. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.