‘कृष्णा’ करणार 1 कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती; पहिला टँकर झाला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कृष्णा कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून टँकर ऑईल कंपनीकडे नुकताच रवाना झाला.या वर्षीही कृष्णा कारखान्याने १ कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक गिरीश पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शुगर सिरपसपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली. यावर्षी १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.