सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. वर्ग तीन संवर्गातील पदे परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. ही नोकर भरती राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेत होत आहे. सातारा जिल्हा परिषद नोकर भरती वर्ग तीनसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे. या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या टप्प्यात तीन संवर्गासाठी परीक्षा होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेतीलही ९७२ रिक्त जागा या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. तर सर्वच जिल्हा परिषदेतील भरतीसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तीन संवर्गासाठी परीक्षा होणार आहे.
दि. १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसांत प्रशासनमधील कनिष्ठ सहायक पदासाठी परीक्षा होणार आहे. तर २१ आणि २६ डिसेंबर रोजी आैषध निर्माण अधिकारी तसेच २३ व २४ डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षांसाठी सातारा शहरात दोन आणि कराड शहरात एक अशाप्रकारे तीन केंद्रे आहेत. तर यानंतरही इतर संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.